मुकेश-नीता अंबानींच्या लग्नाचे फोटो व्हायरल.. फिल्मी लव्हस्टोरी

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी

आशियातले सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीचा नुकताच शाही विवाह सोहळा पार पडला. यादरम्यान मुकेश आणि नीता अंबानी यांच्या लग्नाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मुकेश अंबानी यांच्या आई-वडिलांनी नीता अंबानी यांना पहिल्यांदा एका डान्स शोमध्ये भरतनाट्यम करताना पाहिलं होतं.

डान्सवेळी नीता या खूपच सुंदर दिसत होत्या. मुकेश अंबानी यांच्या पालकांनी त्याचवेळी नीता यांना आपली सून बनवण्याचा निर्णय घेतला.

नीता या मध्यमवर्गीय घरातून येतात. तर मुकेश अंबानी यांचं कुटुंब आर्थिक दृष्ट्या सदन होतं. त्यामुळे नीता अंबानी यांच्या मनात थोडीशी भीती होती.

मुकेश अंबानी एके दिवशी नीता यांना डेटवर घेऊन गेले, त्याचवेळी त्यांनी नीता यांना प्रपोज केलं आणि लग्नासाठी विचारलं.

सुरुवातीला नीता यांनी काहीच उत्तर दिलं नाही. पण नंतर त्यांनी मुकेश अंबानी यांच्याशी लग्नाला होकार दिला.

VIEW ALL

Read Next Story