अभिनेत्री सुचित्रा कृष्णमुर्ती आता अभिनयापासून दूर आहे. पण 90 च्या दशकात ती खूपच प्रसिद्ध होती. तिलाही कास्टिंग काऊचच्या अनुभवातून जावे लागले आहे.
सुचित्राने 'मिस मालिनी'शी बोलताना 16 वर्षांपुर्वीचा धक्कादायक अनुभव सांगितला. त्यावेळी तिचा घटस्फोट होत होता आणि कोणीतरी तिला सारखं फोन करायचा.
आपले पुस्तक ड्रामा क्वीनमध्ये तिने या घटनेचा उल्लेख केलाय. एका श्रीमंत एनआरआयकडून खूप पैसे तिला ऑफर करण्यात आले होते.
तुझ्यासारखी दिसणारी एक चांगली मुलगी हवी आहे, असे एका दलालाने तिला फोनवर सांगितले.
एनआरआयला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय असे त्या दलालाने सुचित्राला फोनवर सांगितले. यावेळी सुचित्राने त्याला याचा अर्थ विचारला.
'तुला पैसे कमी वाटत असतील तर जास्त देऊ. शेखर कपूरची बायको आहेस, जितके पैसे मागशील तितके मिळतील', असे तो फोनवर म्हणाला.
सुचित्राने आणखी एक धक्कादायक अनुभव सांगितला. एका डायरेक्टरने तिला हॉटेलमध्ये बोलावून एक रात्र थांबण्यास सांगितले होते.
'घरी तू जास्त कोणाशी क्लोज आहेस? असं विचारुन वडिलांना फोन कर आणि मी तूला सकाळी घरी ड्रॉप करेन'असे तो डायरेक्टर सुचित्राला म्हणाला.
हे ऐकून सुचित्रा घाबरली आणि रडू लागली. आपली बॅग घेऊन तिथून निघून गेली.