सलमान खानच्या टायगर 3 सिनेमाने थिएटर्समध्ये धुमाकूळ घातलाय.
सिनेमात सलमाननं टायगर नावाच्या एका रॉ एजेंटची भूमिका निभावली आहे.
पण तुम्हाला खऱ्या आयुष्यातला टायगर कोण आहे माहितीये का?
टायगर हा खऱ्या आयुष्यात भारताचा हेर होता.
त्याचं खरं नाव रविंद्र कौशिक असं होतं.
एयरफोर्स ऑफिसरच्या घरी जन्मलेल्या रविंद्रला सिनेमाचे प्रचंड वेड होते.
त्याचं टॅलेंट एका इंटेलिजेंस ऑफिसरने ओळखलं.
आणि इथून रविंद्रच्या हेर बनण्याची सुरुवात झाली.
2 वर्षांच्या प्रशिक्षणानंतर रविंद्रला पाकिस्तानमध्ये पाठवण्यात आलं.
माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधींनी त्याला 'ब्लॅक टायगर' अशी उपाधी दिली होती.