सुनीताचा जन्म हा अतिशय सर्वसाधारण अशा कुटुंबात झाला. तरी देखील तिच्या वडिलांनी तिला कोणत्याही गोष्टीची कमी भासू दिली नाही.
सुनीताचे वडील हे ट्रक ड्रायव्हर होते. बिकट परिस्थिती असली तरी तिच्या वडिलांनी तिला चांगल्या शाळेत शिकवलं.
सुनीतानं 'डिजीटल कमेंट्री'ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला की 'तिनं तिच्या वडिलांच्या कामाविषयी शाळेतील मित्र-मैत्रिणींना खोट सांगितलं होतं.'
सुनीता म्हणाली की 'तिच्या मित्र-मैत्रिणींचे वडील हे कोणी वकील, डॅाक्टर तर कोणी व्यावसायिक होते.'
सुनीताच्या मित्र-मैत्रिणींना सोडायला त्यांचे ड्रायव्हर यायचे. त्याशिवाय त्यांना फ्रेश टिफीन देखील आणून द्यायचे.
सुनीतानं पुढे खुलासा केला की 'तिनं सगळ्यांना सांगितलं होतं की तिचे वडील हे व्यावसायिक आहेत. तर हे खोटं सांगितल्याचं तिला आता वाईट वाटतंय.'
सुनीतानं सांगितलं की 'ती जसजशी मोठी झाली तशी तिला या गोष्टीची जाणीव झाली की तिनं खोटं सांगून चूक केली आहे. कारण त्यात काही लपवण्यासारखं नव्हतं.'