पनीरमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, विटामिन डी- अशी पोषक तत्व आढळतात. पण तुम्हाला माहित आहे का हाच पनीर काही लोकांसाठी घातक ठरू शकतो.
जर तुम्हाला अतिसाराचा त्रास असेल तर पनीर खाणं टाळा यामुळे तुमचा त्रास वाढू शकतो.
उच्च रत्तदाब असलेल्या व्यक्तींनीसुद्धा पनीरचे सेवन करू नये.
अॅसिडिटी, गॅस यांसारख्या समस्या असल्याल पनीरचे सेवन करू नका.
ज्या लोकांचे कोलेस्ट्रोल खूप जास्त आहे त्यांनी पनीर खाणे टाळावे.
पनीरमध्ये फॅट्सचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रोल वाढू शकते. त्यामुळे हृदयविकाराच्या समस्या असलेल्या रूग्णांनी पनीर खाणं टाळा.
ज्यांना दुग्धजन्य पदार्थांची अॅलर्जी आहे त्यांनी पनीर खाऊ नये.