मुकेश अंबानी यांना व्यक्तिमत्त्व सुधारण्यासाठी पुस्तके वाचायला खूप आवडते.
प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका यांनी अशा निवडक पुस्तकांचा खुलासा केला आहे.
हर्ष यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मुकेश अंबानींना कोणत्या प्रकारची पुस्तके आवडतात हे सांगितले आहे.
मुकेश अंबानी यांनी तांत्रिक ज्ञान वाढवण्यासाठी CRISPR/Cas Genome Editing हे पुस्तक वाचले आहे.
क्रिप्टोकरन्सीच्या भविष्याविषयीची उत्सुकता शमवण्यासाठी मुकेश अंबानी यांनी ब्लॉकचेन हे पुस्तक वाचले आहे.
त्याचबरोबर मुकेश अंबानी यांनी नॉन फिक्शनच्या जगात लिओनार्नो दा विंचीचे पुस्तक वाचले आहे.
अनेक मुलाखतींमध्ये मुकेश अंबानी यांनी 'द वर्ल्ड इज फ्लॅट' हे पुस्तक आधुनिक जगात जागतिकीकरण आणि तंत्रज्ञानाची गरज यावर भाष्य करते.