वडील सुपरस्टार, तरी मुलीचे 3 चित्रपट फ्लॉप; काम मिळत नसलं तरी कमावते कोटी

अथिया शेट्टी

बॉलिवूडचा अन्ना अशी ओळख असणाऱ्या सुनील शेट्टीची लेक अथियानं 2015 मध्ये 'हीरो' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

सलमाननं केली होती खास मदत

'हीरो' या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर या चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल आडवाणी यांनी केले होते. तर सलमान खान आणि सुभाष घई यांनी निर्मिती केली. तरी अथियाला यश मिळालं नाही.

'हीरो' नंतर दोन वर्षांनी मिळाला चित्रपट

'हीरो' नंतर अथियाला 2017 मध्ये ‘मुबारकां’ या चित्रपटात दिसला. अनिल कपूर आणि अर्जुन कपूर हे या चित्रपटात तिच्यासोबत होते. तरी सुद्धा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला.

2017 नंतर चक्क 2019 मध्ये मिळाला चित्रपट

2019 मध्ये अथियानं नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत ‘मोतीचूर चकनाचूर' या चित्रपटात दिसला. या चित्रपटानं तिच्या आधीच्या दोन्ही चित्रपटांपेक्षा कमी कमाई केली. हा चित्रपट डिजास्टर ठरला होता.

त्यानंतर मोठ्या पड्यावर दिसली नाही

2019 नंतर अथिया ही कोणत्या चित्रपटात दिसली नाही.

केएल राहुलशी लग्न

अथियानं याच वर्षी लोकप्रिय भारतीय क्रिकेटर केएल राहुलशी लग्न केलं. सुनील शेट्टीच्या लोणावळ्याच्या फार्महाऊसवर दोघांनी लग्न केलं.

चित्रपट नसले तरी इतकी आहे संपत्ती

अथियानं सलग तीन फ्लॉप चित्रपट दिले, त्यासोबत 2019 नंतर मोठ्या पडद्यावर दिसली नाही तरी तिची संपत्ती कशी वाढली असा प्रश्न असेल तर ती इन्स्टाग्रामवर येणाऱ्या जाहिरातींच्या माध्यमातून कोटींची कमाई करते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अथिया आणि केएल राहुलची एकूण संपत्ती ही 110 कोटी आहे. (All Photo Credit : Athiya Shetty Instagram)

VIEW ALL

Read Next Story