जीवनात यशस्वी व्हायचंय तर आजपासून भगवान श्रीकृष्णाच्या 5 गोष्टी फॉलो करा, आजपासूनच नशीब पालटेल

भगवान श्रीकृष्णाकडून काय शिकावे

धकाधकीच्या जीवनात सगळे लोकं यशाच्या मागे धावत आहेत. पण खरंच हे इतकं शक्य आहे? आणि नसेल तर अशी कोणती गोष्ट आहे जी भगवान श्रीकृष्णाकडून शिकण्यासारखं आहे.

आव्हानांनी भरलंय भगवान श्रीकृष्णाचे आयुष्य

भगवान श्रीकृष्णाचा जन्म हा अगदी सुरुवातीपासूनच संघर्षात्मक राहिला आहे. जन्म कारागृहात झाला. पालन-पोषण गोकुळात झाला आणि अत्याचारी मामा कंसाला मारुन ते द्वारकामध्ये राहिले. यानंतर महाभारत घडले.

भगवान श्रीकृष्णाकडून काय शिकाल

भगवान श्रीकृष्णाच्या लीला आपण सगळ्यांनीच ऐकल्या आहेत. मात्र आज आपण भगवान श्रीकृष्णाच्या अशा गोष्टी जाणून घेणार आहोत. ज्याचा परिणाम आपल्या जीवनात होत असतो.

जीवनात प्रत्येक गोष्टीचा सामना करा

भगवान श्रीकृष्ण सांगतात की, कोणत्याही समस्यांना घाबरू नका. त्याचा सामना करायलाच हवा. मग समोर कंस सारखा अत्याचारी आला तरीही. प्रत्येकवेळी संघर्ष करणे आवश्यक आहे. जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत लढत राहायला हवं.

पुस्तकी किडा होऊन राहू नका

भगवान श्रीकृष्ण यांच्याकडून आपण हे शिकायला हवं, की पुस्तकी किडा बनून राहू नका. आजूबाजूच्या समाजाचे निरिक्षण करा. त्याकडून शिका. अभ्यासा व्यतिरिक्त वेगवेगळ्या गोष्टी शिका. जीवनातील परिस्थितीनुसार, स्वतःला तयार करा.

शांतीच्या शेवटच्या स्तरापर्यंत युद्ध नको

महाभारतात श्रीकृष्ण पांडवांकडून कौरवांकडे शांतीदूत म्हणून आले होते. शांतीचे प्रतिक बनून राहा.

नाती सांभाळायला विसरु नका

भगवान श्रीकृष्णाकडूनही अनेक गोष्टी शिका. नाती कायम सांभाळा. जे तुम्हाला आपलं मानतात त्यांची साथ कधीच सोडू नका. कौरवांसमोर द्रोपदीचे वस्त्रहरण सुरु होते. तेव्हा पांडवसह सगळेच मौन होते. पण जेव्हा द्रोपदीने मनापासून परमेश्वराला हाक मारली तेव्हा श्रीकृष्ण धावून आले.

गर्दीत लीडर बना

सगळ्यांना माहित आहे की, श्रीकृष्णाने युद्धात अस्त्र उचलले नव्हते.पण श्रीकृष्ण पांडवांकडून लीडर म्हणून होते.

किंगमेकर

श्रीकृष्णाकडून हे देखील शिकण्यासारखं आहे की, तुम्ही कायम किंगमेकरच व्हा. जीवनात यशस्वी व्हायचंय तर किंगमेकर होणे गरजेचे आहे.

VIEW ALL

Read Next Story