द आर्चिज हा चित्रपट सध्या प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. 7 डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या चित्रपटाची जोरात चर्चा आहे.

सुहाना खान, अगस्त्या नंदा, खुशी कपूर यांचा हा डेब्यू चित्रपट आहे. झोया अख्तरनं हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.

सुहाना, खुशी आणि अगस्त्या नंदाचा आगळावेगळा अंदाज या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

सुप्रसिद्ध लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी या चित्रपटातील गाणी लिहिली आहेत. या चित्रपटातील पहिलं गाणं 'सुनोह' हे प्रदर्शित झालं आहे.

या चित्रपटातील दुसरं गाणं वा वा वूम हे प्रदर्शित झालं आहे. सध्या हे गाणं अनेकांच्या पसंतीस उतरलं आहे. या गाण्यातील डान्स पाहून अनेकांना त्यांचे तरूणपण आठवलं.

ऑक्सवर्ड लर्नर डिक्शनरीनुसार, वा वा वूम म्हणजे लैंगिकदृष्ट्या आकर्षित, जोमदार, सुंदर, उत्तेजित.

1950 साली हा शब्द पहिल्यांदा वापरण्यात आला होता. कारच्या इंजिनचा आवाज दर्शवण्यासाठी हा शब्द वापरण्यात येतो.

VIEW ALL

Read Next Story