सुहाना खानने पोस्ट केलेल्या फोटोंवरील 2 कमेंट्सनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय, पाहूयात काय म्हटलंय या कमेंट्समध्ये...
अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान ही अभिनेत्री तर आहेच पण ती सोशल मीडिया इन्फ्यूएन्सरही आहे. इन्स्टाग्रामवर तिचे लाख फॉलोअर्स आहेत.
सुहाना ही इन्स्टाग्रामवरील पोस्टमुळे अनेकदा चर्चेत असते. बऱ्याच वेळा ती सोशल मीडियावरुन फोटोशूटचे फोटो पोस्ट करत असते.
नुकतेच सुहानाने असे काही फोटो पोस्ट केले आहेत की ज्यामुळे केवळ तिचीच नाही तर तिच्या कथित बॉयफ्रेण्डच्या आईने नोंदवलेल्या कमेंटचीही चर्चा आहे.
मन्नत या आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये क्लिक करण्यात आलेल्या सुहानाच्या फोटोंमध्ये तिने निळ्या रंगाची साडी नेसली आहे.
सुहाना या फोटोंमध्ये फारच सुंदर दिसत आहे. सुहानाची ही साडी अर्पिता महेता यांनी डिझाइन केली आहे. सुहानाला निळ्या रंगाची साडी फार आवडते.
सुहानाने यापूर्वीही अनेकदा साडीमधील फोटो पोस्ट केलेत. तिला साड्या फार आवडतात पण त्यातही निळी साडी विशेष आवडते. काही दिवसांपूर्वी तिची मैत्रीण आलिया कश्यपच्या साखरपुड्यालाही निळ्या साडीतच गेली होती.
कमी मेकअप, चंद्रकोरीच्या आकाराचे झुमके आणि निळ्या रंगाची टिकली लावलेली सुहाना फारच सुंदर दिसत आहे. या फोटोंना लाखो लाईक्स आलेत.
या फोटोंवर सुहानाच्या अनेक मित्रमैत्रिणींनी कमेंट्स केल्यात. मात्र सुहानाचा कथित प्रियकर अगस्त्य नंदाची बहीण आणि आईने केलेल्या कमेंटने अनेकांचं लक्ष वेधलं आहे.
अमिताभची नात असलेल्या नव्या नवेली नंदाने, "सुंदर" अशी प्रतिक्रिया या फोटोवर नोंदवली आहे तर श्वेता बच्चन यांनी 'सुंदर दिसणारी मुलगी' अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे. पुढील स्लाइडमध्ये पाहा सुहानाच्या कथित बॉयफ्रेण्डचा फोटो
सुहाना आणि अगस्त्य नंदाच्या डेटींगच्या चर्चा ख्रिस्मसच्या पार्टीपासून सुरु झाल्या. दोघांच्याही केमिस्ट्रीने सर्वांचा लक्ष वेधून घेतलं.
लवकरच सुहाना 'आर्चीज' चित्रपटाच्या माध्यमातून मनोरंजन सृष्टीत पदार्पण करत आहेत. अगस्त्य नंदाही या चित्रपटातून पदार्पण करतोय.