सेलिब्रेटींचे लहानपणीचे फोटो

सोशल मीडियावर अनेकदा मराठी किंवा हिंदी सेलिब्रेटींच्या लहानपणीचे फोटो हे शेअर होतात.

क्यूट फोटो सतत व्हायरल

सोबतच त्यांच्या या क्यूट फोटोंकडे पाहून सगळेच भारावून जातात. सध्या अशाच एका अभिनेत्रीनं आपला लहानपणीचा फोटो हा सोशल मीडियावर शेअर केला आहे.

स्पृहा जोशीची चर्चा

अभिनेत्री स्पृहा जोशी ही आपल्या सगळ्यांचीच लाडकी अभिनेत्री आहे. तिची सोशल मीडियावरही अनेकदा चर्चा रंगताना दिसते.

स्पृहानं शेअर केलाय लहानपणीचा फोटो

सध्या चर्चा आहे ती म्हणजे तिनं शेअर केलेल्या तिच्या लहानपणीच्या फोटोची. यात ती खूपच क्यूट दिसत असून तिनं तिचा फॅमिली फोटो शेअर केला आहे.

कोण कोण आहे फोटोत?

या फोटोत ती, तिची बहीण क्षिप्रा जोशी आणि आई - वडिल दिसत आहेत. त्यामुळे तिची जोरात चर्चा रंगलेली आहे.

फारच क्यूट पोझ

आपला वडिलांना बिलगून हनवटीवर हात ठेवत तिनं फारच क्यूट पोझ दिली आहे.

गोड कॅप्शन

यावेळी तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'Safety Net!'

स्पृहा जोशी लोकप्रिय अभिनेत्री

तिच्या या फोटोखाली अनेकांच्या कमेंट्सही आल्या आहेत. स्पृहा जोशीला लहानपणी डॉ. ए.पी.जे.अब्दूल कलाम यांच्याकडून बालश्री प्रदान करण्यात आली आहे. सोबतच ती लोकप्रिय अभिनेत्री आणि कवियत्री आहे.

VIEW ALL

Read Next Story