कांद्याच्या साली चुकूनही फेकू नका कचऱ्यात! आहेत अद्भूत फायदे

बहुतांशजण कांद्याच्या साली निरुपयोगी समजून कचऱ्यात फेकतात पण याचे शरीराला खूप फायदे आहेत.

कांद्याची साल लांब आणि दाट केसांसाठी उपयुक्त ठरते. कांद्याची साल जर पाण्यात एक तास भिजत ठेवा आणि नंतर त्याच पाण्याने केस धुवा.

स्किन एलर्जी झाली असेल तर कांद्याच्या साली रात्रभर पाण्यात ठेवा आणि सकाळी पाण्याने स्किन धुवा.

आपल्या डोळ्यांसाठी उपयुक्त असलेले व्हिटॅमिन कांद्याच्या सालीमध्ये असते. याची कमतरता असल्यास डोळे कमकुवत होतात.

कांद्याच्या सालीच्या मदतीने तुमची दृष्टी चांगली होऊ शकते. ही साल पाण्यात उकळून घ्या आणि प्या.

कांद्याच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सीदेखील असते. यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते. कांद्याची साल पाण्यात टाकून पाणी उकळून घ्या ते पाणी फिल्टर करून प्या.

एका कढईत कांद्याची साल टाका त्यात स्वच्छ पाणी घाला. हे पाणी कमी गॅसवर उकळून घ्या, ते गाळून घ्या, कोमट झाल्यावर प्या. यामुळे हृदय विकाराचा धोका कमी होतो.

हेअरवॉश करण्याआधी पाण्यात कांद्याच्या साली टाका. यानंतर या पाण्याने केसावरुन आंघोळ करा. केस मुलायम आणि चमकदार होतील.

शरीरात एलर्जीमुळे होणारी खाज कांद्याच्या सालीमुळे दूर होते.

VIEW ALL

Read Next Story