सखी गोखले आणि सुव्रत जोशी

सखी गोखले आणि सुव्रत जोशी यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगलेली असते. 'दिल दोस्ती दुनियादारी' या 2015 साली आलेल्या मालिकेतून त्यांनी एकत्र काम केले.

अफेअरचीही जोरात चर्चा

त्यानंतर त्यांच्या अफेअरचीही जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. 2017 साली 'दिल दोस्ती दोबारा' ही सिरियल आली जी फारशी प्रेक्षकांची लोकप्रियता मिळवू शकली नाही.

2019 मध्ये लग्न

त्यानंतर त्यांनी 2019 मध्ये लग्न केले. त्यांच्या लग्नाचीही जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. त्यांच्या लग्नाचे फोटोही खूप व्हायरल झाले होते.

नात्याबद्दलचा खुलासा

सध्या सुव्रत जोशीनं त्याच्या आणि सखीच्या नात्याबद्दलचा खुलासा केला आहे. यावेळी तो 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत यावर खुलासा केला आहे.

एखादी वस्तू विकत घेताना आपण ती...

तो म्हणाला की, ''''एखादी वस्तू विकत घेताना आपण ती पारखून बघतो चांगली आहे का नाही. लग्न हा खूप मोठा निर्णय आहे.''

प्रेम असतं पण...

तुमचं एखाद्यावर प्रेम असतं पण तुम्हाला त्या व्यक्तीबरोबर सहवास नाही घडवता येत.'', असं त्यानं पुढे स्पष्ट केले.

प्रेम पुरेसं नसतं तर

तो पुढे म्हणाला की, ''बरेचदा एकत्र राहण्यासाठी प्रेम पुरेसं नसतं. तुम्हाला सहवास गरजेचा आहे...''

म्हणून पाहणं आवश्यक

आणि त्या सहवासादरम्यान आपल्या अनेक सवयी बदलाव्या लागतात. म्हणून लिव्ह इनमध्ये राहून पाहणं आवश्यक असतं.” असं तो म्हणाला.

VIEW ALL

Read Next Story