हॉटेलच्या बाथरुममध्ये श्वेता तिवारीचं बोल्ड फोटो शूट; पाहा फोटो

बोल्ड फोटोंमुळे चर्चेत राहणाऱ्या श्वेताने पोस्ट केले नवे फोटो

बोल्ड फोटोंमुळे चर्चेत

अभिनेत्री श्वेता तिवारी ही कायमच तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे आणि खास करुन बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते.

बोल्ड फोटो शेअर करते

अनेकदा श्वेता सोशल मीडियावरुन तिचे बोल्ड फोटो शेअर करताना दिसते. यामध्ये कधी बिकीनीमधील फोटो असतात तर कधी साडीमधील.

46 लाखांहून अधिक फॉलोअर्स

सोशल मीडियावर श्वेता सक्रीय असल्यानेच तिचे इन्स्ताग्रामवर 46 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

बाथरुममध्ये फोटोशूट

श्वेताने नुकतेच सोशल मीडियावर आपले काही नवीन फोटो पोस्ट केले असून हे फोटो चक्क बाथरुममध्ये काढण्यात आले आहेत.

मुंबईमधील हॉटेलमध्ये फोटोशूट

मुंबई विमानतळाजवळील नॅव्हतोल या हॉटेलमधील बाथरुममध्ये श्वाताने हे बोल्ड फोटोशूट केल्याचं कॅप्शनमध्ये सांगितलं आहे.

डिपनेक ड्रेस

या फोटोंमध्ये श्वेताने डिपनेक ड्रेस परिधान केला आहे. फोटोंमध्ये श्वेता फारच मादक दिसत आहे.

शॉवर घेताना फोटो

एका फोटोत ही 42 वर्षीय अभिनेत्री शॉवर घेताना दिसत आहे. या फोटोंना 3 लाखांहून अधिक लाईक्स आहेत.

आरशासमोर बसून फोटो

तर अन्य एका फोटोमध्ये श्रेता बाथरुममधील आरशासमोर बसल्याचं पहायला मिळत आहे.

42 वर्षांची असल्याचा विश्वास बसत नाही

श्वेताचे हे मादक आणि हॉट फोटो पाहून अनेकांनी ती खरोखरच 42 वर्षांची असल्याचा विश्वास बसत नसल्याचं म्हटलं आहे.

लेडी अनिल कपूर

काहींनी श्वेता ही संतूर मॉम असल्याचं म्हटलंय तर काहींनी तिला लेडी अनिल कपूर म्हणजेच वय कधीच कमी न होणारी महिला असं म्हटलं आहे.

मुलगी पलकपेक्षाही सुंदर

अनेकांनी श्वेता वयाच्या 42 व्या वर्षी तिची मुलगी पलक तिवारीपेक्षाही फारच सुंदर दिसत असल्याचं कमेंट सेक्शनमध्ये म्हटलं आहे.

कमेंट्सचा पाऊस

वाचकांच्या काही निवडक कमेंट्सवरुन श्वेताच्या लोकप्रियतेचा अंदाज बांधता येईल. अनेकांनी हार्ट, फायर इमोजीच्या माध्यमातून प्रतिक्रिया नोंदवली आहे.

VIEW ALL

Read Next Story