करिअरमध्ये मोठे यश हवे आहे? भानुसप्तमीला करा 'हे' उपाय

भानु सप्तमी आज

Bhanu Saptami 2023 - भानु सप्तमी दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी साजरी केली जाते. यावर्षी भानु सप्तमी आज रविवार 25 जून 2023 रोजी साजरी केली जात आहे.

भानु सप्तमीचे उपाय

भानु सप्तमी दिवशी सूर्योदयापूर्वी उठून आंघोळ करून केशरी रंगाचे कपडे घालणे चांगले. यानंतर तांब्याच्या भांड्यात अक्षत, लाल फुले, चंदन आणि साखर टाका. त्यानंतर ते पाण्याने भरुन सूर्यदेवाच्या ‘ओम सूर्याय नमः’ मंत्राचा उच्चार करताना सूर्यदेवाला जल अर्पण करावे. असे केल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात.

स्तोत्राचे पठण करावे

हिंदू धर्मात रविवार सूर्याला समर्पित असतो. या दिवशी सूर्याची विशेष पूजा उपासना केली जाते. भानु सप्तमीच्या दिवशी सकाळी सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर आदित्यने हृदय स्तोत्राचे पठण करावे. यामुळे सूर्यदेवाची कृपा प्राप्त होते

दान केल्याने सूर्य बलवान

भानु सप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी सूर्यदेवाची पूजा केल्यानंतर लाल वस्त्र, गहू, तांबे, गूळ इत्यादींचे दान करावे. सूर्याशी संबंधित वस्तू गरीब ब्राह्मणाला दान केल्याने कुंडलीत सूर्य बलवान होतो.

खूप फायदा

भानु सप्तमीच्या दिवशी सूर्य चालिसाचा पाठ केल्याने आणि सूर्यदेवाची आरती केल्यानेही खूप फायदा होतो.

उपासना करता येत नसेल तर

नियमानुसार सूर्यदेवाची उपासना करता येत नसेल तर किमान सूर्य मंत्रांचा जप करा. 1. ॐ मित्राय नमः. 2. ॐ रवये नमः. 3. ॐ सूर्याय नमः. 4. ॐ भानवे नमः. 5. ॐ खगाय नमः. 6. ॐ पूष्णे नमः. 7. ॐ हिरण्यगर्भाय नमः. 8. ॐ मरीचये नमः. 9. ॐ आदित्याय नमः. 10. ॐ सवित्रे नमः. 11.ॐ अर्काय नमः. 12. ॐ भास्कराय नमः.

करिअर आणि व्यवसायात वृद्धी

असे सांगितले जाते की, श्रीकृष्णाच्या मुलाने सूर्य उपासना केली होती, ज्याचे फळ म्हणून साम्बची कुष्ठ रोगातून मुक्तता झाली. ज्योतिष्य देखील कुडलीतील सूर्य मजबूत करण्याचा सल्ला देतात. यामुळे करिअर आणि व्यवसायात इच्छित वृद्धी होते.

अचला सप्तमी, सूर्यरथ सप्तमी

भानुसप्तमीला सूर्याच्या उपासनेने उत्पन्न, आयुष्य, सुख आणि समृद्धी यात वृद्धी होते. त्यामुळे विधीवत सूर्य देवाची उपासना करायला हवी. या भानुसप्तमीलाच अचला सप्तमी, सूर्यरथ सप्तमी, आरोग्य सप्तमीसुद्धा म्हटले जाते.

VIEW ALL

Read Next Story