श्वास चित्रपटातील बालकलाकार

'श्वास' हा चित्रपट आपल्यापैंकी अनेकांनी पाहिलाच आहे. या चित्रपटातील लहान मुलाच्या अभिनयाचे कोण कौतुक झाले होते. (All Photos: Ashwin Chitale)

आजही कौतुक

त्यातून या चित्रपटाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. परश्या या लहान मुलांचेही आजही कौतुक होते.

तो सध्या काय करतो?

तो सध्या सूफी कवी रुमी आणि गालिब यांच्या गझलांवर छोटे कार्यक्रम सादर करतो. त्यानं इंडोलॉजीमध्ये शिक्षण घेतले असून उर्दू आणि पारसी भाषेवरही प्रभुत्व मिळवलं आहे.

अभिनय नाही मग?

परंतु त्यानंतर तो अभिनयात फारसा दिसला नाही. आता 19 वर्षांनंतर तो नक्की काय करतो असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. यावेळी त्यानं पहिल्यांदा मुलाखत दिली आहे.

पहिलीच मुलाखत

'मित्र म्हणे' या सौमित्र पोटे यांच्या पॉडकास्टमध्ये अश्विन चितळेनं यावेळी पहिल्यांदाच मुलाखत दिली आहे.

श्वासनंतर?

यावेळी तो म्हणाला की, '''श्वास'नंतर मी 16 चित्रपट केले, पण बारावीनंतर मला जसे चित्रपट अपेक्षित होते त्याऐवजी टिपिकल रोमॅंटिक लव्ह स्टोरीच्या ऑफर्स मला यायला लागल्या. मला तसे चित्रपट करायचे नव्हते त्यामुळे मी यातून बाहेर यायचं ठरवलं. 'श्वास'मध्ये जे मी काम केलं ते माझ्याकडून करवून घेतलं.''

नकारात्मक बाजू

तो पुढे म्हणाला की, ''त्याचं संपूर्ण श्रेय हे दिग्दर्शकांनाच जातं. घरच्यांनीसुद्धा मला यात फार मदत केली. शिक्षणाला पहिले प्राधान्य द्यायचं हे ठरलेलंच होतं. 'श्वास'मुळे प्रसिद्धीची एक नकारात्मक बाजू पाहिली. सुदैवाने त्याचा माझ्यावर वाईट परिणाम झाला नाही.''

VIEW ALL

Read Next Story