एलॉन मस्कच्या पगाराचा आकडा पाहून आकडी येईल; टाटा मोटर्स, SBI ची वर्षिक कमाईही फिकी

टेस्लाचा मोठा निर्णय

जगप्रसिद्ध वाहननिर्मिती कंपनी असलेल्या टेस्लाच्या समभागधारकांनी म्हणजेच शेअर होल्डर्सने एक मोठा निर्णय घेतला.

पगारवाढीला मंजूरी

कंपनीच्या शेअर होलडर्सने कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क यांच्या पगारवाढीला मंजुरी दिली आहे.

किती झाला मस्क यांचा पगार?

त्यामुळे मस्क यांना आता 56 बिलिअन अमेरिकी डॉलर्स इतका वर्षिक पॅकेज मिळणार आहे.

टाटा मोटर्सच्या कमाईपेक्षाही अधिक पगार

तुम्हाला जाणून धक्का बसेल पण मस्क यांना दिला जाणारा पगार हा आर्थिक वर्ष 2024 मध्ये टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्या कंपनीच्या एकूण वार्षिक महसुलापेक्षाही अधिक आहे.

टाटाचा एकूण वार्षिक महसूल किती?

टाटा मोटर्सने 2024 च्या आर्थिक वर्षात 52.44 बिलियन अमेरिकी डॉलर्सचा महसूल गोळा केला आहे.

भारतीय चलनानुसार कमाई किती?

म्हणजेच टाटा मोटर्सची कमाई ही भारतीय चलनानुसार 4.38 लाख कोटी रुपये इतकी आहे.

मस्क यांचा नेमका पगार किती?

म्हणजेच मस्क यांचा वार्षिक पगार हा 4.38 लाख कोटी रुपयांहूनही अधिक आहे. मस्क यांचा पगार भारतीय चलनानुसार 4.68 लाख कोटी इतका आहे.

या भारतीय कंपन्यांच्या कमाईपेक्षाही अधिक पगार

भारतामधील एचपीसीएल (52.09 बिलियन अमेरिकी डॉलर्स), एसबीआय (40.35 बिलियन अमेरिकी डॉलर्स) आणि टीसीएस (29.04 बिलियन अमेरिकी डॉलर्स) कंपन्यांच्या कमाईपेक्षाही मस्क अधिक पगार घेतात.

VIEW ALL

Read Next Story