लाईफस्टाईल एशियानुसार गौरी खानकडे एकूण 1600 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
किंग ऑफ बॉलिवूड, अभिनेता शाहरुख खानची पत्नी असण्यासोबतच तिची 'क्वीन ऑफ बॉलिवूड' अशीही ओळख आहे.
अभिनेता शाहरुख खानच्या श्रीमंतीचं अप्रूप वाटत असतानाच त्याची पत्नी गौरीसुद्धा या बाबतीत मागे नाही.
शाहरुखची पत्नी असण्यासोबतच गौरी एक लोकप्रिय इंटिरियर डिझायनरही आहे. अनेक सेलिब्रिटींची घरं, स्टुडिओ, स्टोअर, रेस्तरां तिनं डिझाईन केले आहेत.
रेड चिलीज या निर्मिती संस्थेमध्येही गौरीची भागिदारी असून, या निर्मितीसंस्थेअंतर्गत अनेक चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे.
2017 मध्ये गौरीनं एक डिझायनर कंपनीसुद्धा लाँच केली होती. याशिवाय मुंबईतील वांद्रे इथं तिचं एक रेस्तराँसुद्धा आहे.