...म्हणून शाहरुखनं घेतली काश्मीरमध्ये पाय न ठेवण्याची शपथ

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानने आत्तापर्यंत सर्व जग पालथं घातलं आहे. मात्र, अद्याप त्याने भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमध्ये पायदेखील ठेवला नाहीये.

शाहरुख खानने काश्मीरमध्ये कधीच न जाण्याची शपथ घेतली आहे. याचे कारण एका कार्यक्रमात शाहरुखने स्पष्ट केले आहे. शाहरुखची आजी काश्मीरी होती. त्यामुळं त्यांच्या वडिलांनी त्यांना एकदातरी काश्मीर, इटली आणि इस्तांबूलमध्ये जाण्याची इच्छा सांगितली होती.

शाहरुखने एका कार्यक्रमात सांगितलं होतं की, तो इटली किंवा इस्तांबुलमध्ये त्यांच्या वडिलांशिवाय जाऊ शकतो. मात्र काश्मीरमध्ये तो वडिलांसोबतच जाईल. कारण शाहरुखच्या वडिलांना त्यांना काश्मीर दाखवायचं होतं.

शाहरुखने ही गोष्ट काही वर्षांपूर्वी केबीसीमध्ये सांगितली होती. शाहरुखने म्हटलं की तो पूर्ण जग फिरला आहे. पण अजून काश्मीरमध्ये पायदेखील ठेवला नाहीये.

काश्मीरला जाण्याचा अनेकदा योग आला मात्र शाहरुख एकदाही काश्मीरमध्ये गेला नाही. कारण शाहरुखच्या वडिलांनी त्याला म्हटलं होतं की, काश्मीर माझ्याशिवाय बघू नकोस

शाहरुख खानच्या वडिलांचे तो लहान असतानाच निधन झाले होते.

शाहरुख खानने इतक्या वर्षांची शपथ एका चित्रपटासाठी मोडली आहे. डंकी चित्रपटासाठी 2023 साली एप्रिल महिन्यात तो काही महिन्यांसाठी श्रीनगरला गेला होता.

VIEW ALL

Read Next Story