गोळ्या घालून हत्या

18 जून 2023 रोजी कॅनडाच्या एका शहरात खलिस्तान टायगर फोर्सचा प्रमुख आणि दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

निज्जरच्या हत्येनंतर गोंधळ

निज्जरच्या हत्येनंतर कॅनडाच्या जागतिक शीख संघटनेने मोठा गदारोळ केला. आता या प्रकरणाच्या तीन महिन्यांनंतर कॅनडाच्या पंतप्रधानांनी यामागे भारताचा हात असू शकतो असं म्हटलं आहे.

कोण होता निज्जर?

निज्जर हा मूळचा पंजाबमधील जालंधर जिल्ह्यातील असून 1995 मध्ये तो कॅनडाला गेला होता. तेव्हापासून तो 'खलिस्तानी दहशतवाद'शी जोडला गेला.

स्फोट प्रकरणात आले होते नाव

2007 मध्ये लुधियानामध्ये शिंगार सिनेमात स्फोट प्रकरण आणि 2009 मधील पटियालात राष्ट्रीय शीख संगत अध्यक्ष रुलदा सिंह यांच्या हत्या प्रकरणात निज्जरचे नाव आले होते.

कॅनडामध्ये दहशत निर्माण केली

वृत्तानुसार, निज्जर कॅनडातील गँगस्टर अर्शदीप सिंग गिल सहकारीही बनला होता. पंजाब आणि कॅनडात दहशतवादी कारवाया करण्यासाठी पैसे पुरवण्यामध्ये त्याचा सहभाग होता.

गुरुद्वारासमोर निज्जरची हत्या

कॅनडातील सरे शहरात 18 जून रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास दोन हल्लेखोरांनी गुरुद्वाराच्या आवारात निज्जरची गोळ्या झाडून हत्या केली.

डोक्यावर होते 10 लाखांचे बक्षिस

राष्ट्रीय तपास संस्थेने जालंधरमधील पुजाऱ्याच्या हत्येप्रकरणी फरारी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरवर 10 लाखांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.

भारतावर हत्येचा आरोप

कॅनडाच्या जागतिक शीख संघटनेने निज्जरच्या हत्येमागे भारतीय गुप्तचर संस्था असल्याचा आरोप केला होता. निज्जर यांच्या हत्येचा सखोल तपास करण्याची मागणी संघटनेने केली होती.

VIEW ALL

Read Next Story