टॉयलेट आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही.
या टॉयलेटला असणाऱ्या फ्लशची बटणे ही दोन विभागात विभागलेली असतात.
परंतु टॉयलेटच्या फ्लशची बटणं ही दोन विभागात का विभागली जातात ? असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का?
युनायटेड किंग्डममधील एका पाणीपुरवठा कंपनीने एका अशा प्रश्नाचं उत्तर शोधून काढलं आहे.
1976 मध्ये अमेरिकन औद्योगिक डिझायनर विक्टर पैपनेक यांनी हा शोध लावला.
टॉयलेट फ्लशचं एक बटण कमी पाणी भांड्यात सोडण्यासाठी आणि दुसरं जास्त पाणी भांड्यात सोडण्यासाठी वापरलं जातं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार,घरामध्ये सिंगल फ्लशऐवजी ड्युअल फ्लशिंगचा अवलंब केल्यास वर्षभरात सुमारे 20 हजार लिटर पाण्याची बचत होऊ शकते.