संजय दत्तची लाडकी लेक त्रिशा दत्तला सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ती तिच्या चाहत्यांना तिच्या पर्सनल आयुष्याविषयी अपडेट देत असते.

त्रिशालाचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे.

नुकताच त्रिशालाने तिच्या इन्स्टाग्रामवर आस्क मी एनिथिंग हे सेशन तिच्या चाहत्यांसाठी ठेवलं होतं.

यावेळी तिच्या चाहत्यांनी तिला अनेक पर्सनल आणि प्रोफेशनल प्रश्नही विचारले.

यावेळी तिला तिच्या एका चाहत्याने विचारलं की, तुला कधी आई व्हायला आवडेल का? याबाबत तुझा काय प्लान आहे. तुझ्या डोक्यात काही नाव आहे का?

''मला मूल हवं आहे. जर देवाने माझ्यासाठी या सगळ्याचं प्लानिंग केलं असेल तर मला एक दिवस आई व्हायला आवडेल. आणि हो, मी त्यांच्या नावांचाही विचार केला आहे.''

त्रिशालाने चाहत्यांना सांगितले की, तिला आयुष्यात कधीतरी आई व्हायला नक्कीच आवडेल.

VIEW ALL

Read Next Story