हेल्दी डाएट, वर्कआऊट...'या' सवयीच्या बळावर साठीकडे जाणारा सलमान इतका फिट; तुम्हालाही होईल मदत
वयाच्या 58 व्या वर्षीसुद्धा सलमान इतका फिट आहे, की भल्याभल्यांना त्याच्या सुदृढतेचा हेवा वाटतो. साठीच्या दिशेनं वाटचाल करणाऱ्यांना सलमानच्या जीवनशैलीबाबत कमालीचं कुतूहल असतं.
असा हा सलमान त्याच्या आयुष्यात दैनंदिन व्यायामाला प्रचंड महत्त्वं देतो, सोबत जोड असते ती म्हणजे संतुलित आहाराची. सलमानच्या व्यायामामध्ये 1-2 तासांचा व्यायाम, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि कार्डिओचा समावेश आहे. शिवाय तो सायकलिंग आणि हायकिंगही करतो.
व्यायामासोबतच सलमान संतुलित आहारालाही प्राधान्य देतो. त्याच्या आहारामध्ये सेंद्रीय पद्धतीनं उगवलेल्या भाज्या, धान्य आणि प्रोटीनचा समावेश असतो. सलमान सहसा तेलकट आणि गोड पदार्थ टाळतो असं सांगितलं जातं.
एका मुलाखतीमध्ये समाननं त्याच्या आहाराच्या सवयींचा खुलासा केला होता. अंड्याचा पांढरा भाग आणि लो फॅट दुधानं त्याच्या दिवसाची सुरुवात होते. त्यानंतर दुपारच्या जेवणात तो 1-2 चपात्या, ग्रिल्ड भाज्या आणि सॅलड खातो. रात्रीच्या जेवणात सलमान अंड्याचा पांढरा भाग, मासे आणि भाज्यांसोबत सूप आणि चिकन खातो.
खाण्यासोबतच सलमान व्यायाम चुकवत नाही. दिनचर्या कितीही व्यग्र असली तरीही तो दिवसातून किमान तासभर व्यायाम करतो.
सलमानच्या या सवयी पाहता तो उतारवयातही इतका फिट कसा? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालंच असेल. आता या सवयी तुम्हीही अंगी बाणवणार ना?