बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा आज वाढदिवस आहे. आज सलमान वयाच्या 59 व्या वर्षात पदार्पण करत आहे.
सलमान खान हा त्याच्या अभिनयाबरोबरच त्याच्या रिलेशन्समुळेही चांगलाच चर्चेत राहिला.
कायम वादात अडकणाऱ्या सलमानच्या लव्ह लाईफमध्ये अनेक महिला आहेत. मात्र सर्वाधिक चर्चेत राहिलं ते एका खास व्यक्तीसोबतचं वादग्रस्त ठरलेलं नातं
सलमानचं सर्वात चर्चेत राहिलेले रिलेशनमध्ये ऐश्वर्या रायसोबतचं नातं.
1999 साली 'हम दिल दे चुके सनम'च्या सेटवर सलमान आणि ऐश्वर्या दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.
मात्र नंतर सलमान ऐश्वर्याबद्दल फार पजेसिव्ह झाला. तो अचानक तिच्या चित्रपटांच्या सेटवर जाऊ लागला.
एकदा तर सलमानने रात्री 3 वाजता ऐश्वर्याच्या घराबाहेर गोंधळ घातला होता.
सतत दरवाजा वाजवत दार उघडण्यासाठी सलमान ऐश्वर्याच्या घराबाहेर आरडाओरड करत होता.
दार उघडून मला घरात घेतलं नाही तर मी जीव देईन अशी धमकी सलमानने दिल्याचं प्रसारमाध्यमांचे रिपोर्ट्स सांगतात.
आपल्या कामापेक्षा सलमानच्या या स्टंटबाजीमुळे चर्चेत राहिल्याने ऐश्वर्याने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. सलमानला याचा फार मोठा धक्का बसला.
ब्रेकअपच्या आसपास विवेक ऑबरॉय प्रकरणामुळे ऐश्वर्या आणि सलमान परत चर्चेत आले.
2003 साली सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचं ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या विवेक ऑबोरॉयला डेट करत होती.
दरम्यान, विवेकने अचानक खळबळजनक दावा करत सलमानने आपल्याला 41 वेळा फोन करुन ऐश्वर्या रायबरोबरच्या नात्यावरुन धमकावल्याचं सांगितलं.
यानंतरपासून विवेक आणि सलमानमध्ये कायमची दरी निर्माण झाली जी आजही कायम आहे.
नंतर ऐश्वर्याने अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चनशी लग्न केलं. या दोघांना आराध्या नावाची मुलगीही आहे.