आराध्याचा रुसवा घालवण्यासाठी अमिताभ देतात 'ही' खास भेट

अमिताभ-आराध्या

अमिताभ हे त्यांची नात आराध्यावर खूप प्रेम करतात.

आराध्या अमिताभ यांना या नावानं हाक मारते

आराध्या ही आजोबा अमिताभ बच्चन यांना दादाजी म्हणून हाकमारते. तर जया बच्चन त्यांना स्ट्रॉबेरी म्हणून हाक मारतात.

आराध्या रुसल्यावर अमिताभ काय करतात?

जर आराध्या अमिताभ यांच्यावर रुसली तर ते तिला चॉकलेट्स देतात, असं त्यांनी कोन बनेगा करोडपतीमध्ये सांगितलं होतं.

चॉकलेटशिवाय आणखी काय देतात भेट

अमिताभ यांनी सांगितलं की 'ते आराध्याला चॉकलेटसोबत गुलाबी रंगाच्या हेअर क्लिप आणि हेअरबॅन्ड भेट करतात.'

आराध्यासोबत खेळतात

अमिताभ म्हणाले की 'त्यांना आराध्यासोबत जास्त वेळ मिळत नाही. पण जेव्हाही त्यांना वेळ मिळतो तेव्हा तिच्यासोबत खेळतात.'

एकाच घरात राहून नाही होत आराध्याशी भेट

अमिताभ यांनी सांगितलं की 'ते सकाळी 7.30 वाजता कामावर निघतात. तर, आराध्या 8 वाजता शाळेत जाण्यासाठी निघते. तर ती 3-4 वाजता घरी येते, त्यानंतर ऐश्वर्या तिचा अभ्यास करून घेते. दुसरीकडे अमिताभ रात्री 10-11 वाजता घरी येतात.'

रविवार हा आजोबा नातीचा वार

त्या दोघांना आठवड्याच्या इतर दिवशी वेळ मिळत नाही. त्यामुळे जर रविवारी अमिताभ फ्री असतील तर ते आराध्यासोबत खेळतात तिच्यासोबत वेळ व्यथित करतात.

गॅजेट्समुळे राहतात संपर्कात

इतरवेळी ते समोरासमोर नसतात त्यामुळे ते अनेकदा व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात राहतात. (All Photo Credit : Social Media)

VIEW ALL

Read Next Story