यशस्वी होण्यासाठी काय केलं पाहिजे याबद्दल आचार्य चाणक्य काय म्हणतात पाहूयात...
केवळ भारतातच नाही तर जगभरामध्ये आचार्य चाणक्य यांच्या नीति आदर्श मानली जाते.
चाणक्य यांचा जन्म दीड हजार वर्षांपूर्वी झालेला. त्यांनी राजकारण, लष्कर, समाज, राष्ट्रवादाबरोबरच खासगी आयुष्यासंदर्भातील अनेक सल्ले आणि नीति धोरणं लिहून ठेवली आहेत.
हीच धोरणं आता चाणक्य नीति म्हणून ओळखले जातात. यामध्येच आयुष्यभर इतरांपेक्षा सरस राहण्यासाठी 4 महत्त्वाच्या गोष्टींचा पालन करण्याचा सल्ला दिला आहे. याबद्दलच जाणून घेऊयात..
कोणतीही व्यक्ती जन्माने, कुळाने किंवा शरीर अथवा धन-संपत्तीमुळे श्रेष्ठ ठरत नाही. तर ती आपल्या गुणांमध्ये श्रेष्ठ ठरते.
एखादी व्यक्ती गरीब असली तरी विद्वत्तेच्या जोरावर ती महान बनू शकते. अशी व्यक्ती सर्वांनाच प्रिय आणि आदर्श वाटते, असं चाणक्य सांगतात.
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवायला हव्यात. यामध्ये पैसे कमवण्याचं माध्यम, योग्य मित्र हे सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावतात, असं चाणक्य सांगतात.
योग्य वेळेस योग्य निर्णय घेणे, पैसे खर्च करताना योग्य मार्ग निवडणे, सकारात्मक ऊर्जा स्त्रोत यासारख्या गोष्टी आपल्याला विकासाच्या दिशेने घेऊ जातात, असं चाणक्य सांगतात.
चाणक्य नीतिनुसार, कोणत्याही व्यक्तीने फार सरळ मार्गी असू नये किंवा फार तिरक्यातही जाऊ नये. हे दोन्ही मार्ग व्यक्तीला मूळ मार्गावरुन भटकवतात.
स्वभावाने अगदी सरळ, साधं पण व्यवहारामध्ये हुशार आणि सजग असलं पाहिजे. अशा व्यक्तीलाच कलयुगामध्ये यश मिळतं असं चाणक्य नीति सांगते.
फळाच्या अपेक्षाने एखादं काम करणं चुकीचं नाही. मात्र असं करताना स्वार्थ भावना मनात असून नये असं चाणक्य म्हणतात.
अनिश्चित गोष्टी मिळवण्याच्या नादात निश्चित गोष्टीही गमावून बसण्याची वेळ येणार नाही याची काळजी घ्यावी, असं चाणक्य सांगतात.
कोणताही निर्णय घेण्याआधी त्याचा सर्व बाजूने विचार केला पाहिजे. त्याच्या परिणामांचाही विचार केल्यास यश नक्की मिळतं, असं चाणक्य सांगतात.
Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.