अनेक कारणानी चर्चेत असणारा Oppenheimer हा चित्रपट नेमका का पाहावा यामागची कारणं जागतिक स्तरांवरील चित्रपटाचे रिव्ह्यू पाहून समोर येत आहेत. चला तर मग जाणून घेऊया 'ओपेनहायमर' का पाहावा यामागची 10 कारणं...
हा एक सत्य घटनांवर आधारित चित्रपट असून, प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलननं त्याचं दिग्दर्शन केलं आहे.
जगात हाहाकार माजवणाऱ्या अणुबॉम्बची निर्मिती का झाली, त्याचा वापर कोणत्या परिस्थितीमध्ये केला गेला यावर चित्रपटातून प्रकाश टाकण्यात आला आहे.
हा चित्रपट घरांमध्ये पाहण्यापेक्षा तो मोठ्या पडद्यावर अर्थात सिमेमागृहात जाऊन पाहिल्यास त्याची व्यापकता लक्षात येईल. आपण एखादा 3D चित्रपट पाहतोय याचीच अनुभूती तुम्हाला Oppenheimer पाहताना येईल.
अण्वस्त्र सुसज्ज देश करण्यासाठी जिथं जगभरातील लष्करं जिकरीनं प्रयत्न करत आहेत तिथंच या साऱ्याची सुरुवात नेमकी कुठून झाली हे चित्रपटातून पाहता येणार आहे.
चित्रपट भारतीय प्रेक्षकांसाठी अधिक खास आहे, कारण प्रत्यक्षात अणूबॉम्बचे जनक असणाऱ्या ओपेनहायमर यांचं भगवद् गीतेशी असणारं नातं.
जगात शांतता हवी यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या व्यक्तीनं एक अशी गोष्ट साकारली ज्यामुळं ती व्यक्तीच विध्वंसाचं मूळ ठरली. अशी असामान्य कथा चित्रपटाचा गाभा.
चित्रपटाची स्टारकास्ट हे तो पाहण्यासाठी जाण्यामागचं आणखी एक कारण. नोलनचा चित्रपट म्हटला की त्यामध्ये कलाकारांच्या अफलातून भूमिका तुम्हाला एकाच जागी खिळवून ठेवतात
आणखी एक अतिशय महत्त्वाची जमेची बाजू म्हणजे चित्रपटाचं पार्श्वसंगीत. प्रत्येक दृश्य प्रभावी करण्यासाठी चित्रपटासाठी साकारण्यात आलेलं पार्श्वसंगीतही तुम्हाला एक वेगळाच अनुभव देऊन जातं.