DDLJ चा रिमेक?

'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' हा बॉलिवूडच्या कल्ट चित्रपटांपैकी एक आहे. आजही या चित्रपटाचे करोडो चाहते आहेत.

मुकेश छाबडा यांच्यामुळे चर्चा

या चित्रपटाच्या रिमेकसंबंधी वेगवेगळ्या बातम्या समोर येत असतात. पण आता कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबडा यांनी DDLJ च्या रिमेकसंबंधी असं काही म्हटलं आहे, ज्यामुळे चाहते उत्साहित आहेत.

रिमेकमध्ये कोणाला कास्ट करणार?

'फरीदून शहरयार'ला दिलेल्या मुलाखतीत मुकेश छाबडा यांना DDLJ च्या रिमेकमध्ये तुम्ही कोणाला कास्ट कराल असं विचारण्यात आलं होतं?

शाहरुखचा मुलगा आर्यन?

त्यावर उत्तर देताना मुकेश छाबडा यांनी म्हटलं की, DDLJ च्या रिमेकमध्ये शाहरुखच्या जागी आर्यनला घेईन. कारण तो चार्मिंग असून चांगला अभिनेताही आहे.

काजोलच्या जागी न्यासा?

तसंच काजोलच्या भूमिकेसाठी त्यांनी न्यायाचं नाव घेतलं आहे.

न्यासा सध्या अभिनय शिकतीये

ते म्हणालेत की, DDLJ मध्ये काजोलच्या भूमिकेसाठी न्यासा एकदम योग्य आहे. ती सध्या अभिनयही शिकत आहे.

1995 मध्ये प्रदर्शित

DDLJ चित्रपट 1995 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. शाहरुख आणि काजोलची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.

28 वर्षांनंतरही DDLJ प्रेक्षकांच्या मनात

28 वर्षांनंतरही चित्रपटावर प्रेक्षक तेवढंच प्रेम करत आहेत. चित्रपटातील गाणी आजही लोकांच्या ओठांवर आहेत. त्यात जर चित्रपटाचा रिमेक झाला तर तो चाहत्यांसाठी भेट असेल.

VIEW ALL

Read Next Story