दरम्यान, ऋता ही 'सर्किट' या चित्रपटात झळकली होती. छोट्या पडद्यावरील ‘दुर्वा’, ‘फुलपाखरु’, ‘मन उडू उडू झालं’ यांसारख्या मालिकांमध्ये तिने भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

या फोटोत ऋता आणि प्रतीक कपल गोल्स देताना दिसत आहेत.

"उजळलेला दिवस आणि रात्रीचा झगमगाट, सध्या युरोपात मुक्काम", असे कॅप्शन ऋताने दिले आहे.

ऋता आणि प्रतीक हे युरोपात फिरताना दिसत आहे. तिने तिचे काही खास फोटो पोस्ट केले आहे.

ऋताने 18 मे 2022 रोजी लोकप्रिय दिग्दर्शक प्रतीक शाहबरोबर लग्नगाठ बांधली. सध्या ती तिच्या नवऱ्यासोबत सुट्ट्या एन्जॉय करताना दिसत आहे.

नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये ऋताने तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

छोट्या पडद्यावरील ‘दुर्वा’ या मालिकेमुळे तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले. पण 'फुलपाखरु' या मालिकेमुळे तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली.

महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री म्हणून ऋता दुर्गुळेला ओळखले जाते. ती मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

VIEW ALL

Read Next Story