पुढचं पाऊल या मालिकेतून घरा-घरात पोहचलेली अभिनेत्री जुई गडकरी नेहमीच सोशल मीडियावर तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असते.

सोशल मीडियावर जुईचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. जुईने एखादी पोस्ट शेअर करताच ती व्हायरल होवू लागते.

नुकताच जुईने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

या व्हिडीओमधून तिने पर्यटकांची चांगलीच कान उघडणी केली आहे.

शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये जुई म्हणतेय की, ''निसर्गाची काळजी घ्या.. तरच निसर्ग आपली काळजी घेईल…मी हे बर्‍याचदा पाहते.. लोक कचरा जिथे फेकून द्यावासा वाटतात तिथेच टाकतात!

''डस्टबिनमध्ये फेकण्यापासून तुम्हाला कोण थांबवतं?? प्लॅस्टिक आणि इतर कचऱ्याने झाकलेली अशी सुंदर ठिकाणे पाहून मन हेलावून जातं...

मित्रांनो समजूतदार व्हा नाहीतर अशा ठिकाणी जाऊ नका..कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकणं थांबवता येत नसेल तर प्लिज आपल्या घरात तो आवश्य फेका आणि त्यातच रहा!''

VIEW ALL

Read Next Story