कुशल बद्रिके हा आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता आहे. त्यामुळे सर्वत्र त्याचीच चर्चा रंगताना दिसते.
आपल्या विनोदानं तो कायमच सगळ्यांना हसवत असतो. त्याच्या अभिनयाचेही सर्वत्र कौतुक होताना दिसते.
परंतु सध्या देशभरात चर्चा आहे ती म्हणजे मणिपूरमध्ये घडणाऱ्या हिंसाचाराची. यावेळी महिलांवर होणाऱ्या अत्याचारांकडे पाहता त्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे.
यावर आता कुशल बद्रिकेनंही निषेध व्यक्त केला आहे. यावेळी त्यानं एक पोस्ट शेअर केली आहे.
यामध्ये तो म्हणतो की, ''कौरवांनी द्रौपदीचे कपडे काढले खरे पण, लाज निघाली ती पांडवांची…ध्रुतराष्ट्राच्या नजरेने भरलेल्या ह्या समाजाचा मी सुद्धा एक हिस्सा आहे ह्याची मला प्रचंड कीव येते.
मी हात जोडून वाट बघतोय श्री कृष्णाची आता त्याने अवतरण्याची गरज आहे. मी निषेध करतो मणिपुर घटनेचा'' अशी पोस्ट त्यानं शेअर केली आहे.
सलील कुलकर्णी, रेणुका शहाणे, हेमांगी कवी, स्वप्नील जोशी, हेमंत ढोमे, अभिज्ञा भावे या मराठमोळ्या कलाकारांनीही यावेळी या घटनेवर निषेध व्यक्त केला आहे.