या यादीमध्ये कर्नाटकातील आमदार सर्वात वरच्या स्थानी आहेत.
अहवालानुसार, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री हे देशातील सर्वात श्रीमंत आमदार आहेत. त्यांच्याकडे एकूण 1413 कोटींची संपत्ती आहे
दुसऱ्या स्थानी आहेत के एच पुट्टास्वामी. बंगळुरूपासून 80 किमी अंतरावर असलेल्या गौरीबिदानूर येथील के एच पुट्टास्वामी आमदाक आहेत. गौडा यांच्याकडे 1,267 कोटी रुपयांची संपत्ती असून त्यांच्यावर 5 कोटी रुपयांचे कर्ज आहे.
तिसरे सर्वात श्रीमंत काँग्रेसचे सर्वात तरुण आमदार प्रियकृष्ण. 39 वर्षीय या आमदाराने 1,156 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे
तेलगू देसम पार्टीचे प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांच्याकडे 668 कोटींची संपत्ती आहे
गुजरातच्या मनसा मतदारसंघाचे आमदार जयंतीभाई सोमाभाई यांची संपत्ती 661 कोटी इतकी आहे.
भारतातील सर्वात गरीब आमदार हे पश्चिम बंगालमधील निर्मल कुमार धारा आहेत. त्यांच्याकडे 1,700 रुपयांची मालमत्ता आहे आणि कोणतेही कर्ज नाही.
ओडिसाचे अपक्ष आमदार हेसुद्धा गरीब आमदारांच्या यादीत आहेत. त्यांची एकूण संपत्ती 15000 रुपये इतकी आहे.
पंजाबच्या आम आदमी पक्षाचे आमदार नरिंदर पाल सिंग यांचाही या यादीमध्ये समावेश आहे. त्यांची संपत्ती 18,370 इतकी आहे.