'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या मालिकेची सर्वत्र चर्चा रंगलेली आहे. मोठ्या ब्रेकनंतर ही मालिका आता प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.
त्यातून आता या मालिकेतील कलाकारांची चांगलीच चर्चा रंगेलली आहे. यावेळी गौरव मोरेच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.
इट्स मज्जाच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या एका मुलाखतीत गौरव मौर, समीर चौघुले आणि निमिष कुलकर्णी हजर होते.
दत्तू मोरेनंतर आता पुढचं लग्न कोणाचं आहे असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी निमिष म्हणाला की आता गौरव मोरे लग्नबंधनात अडकणार आहे.
कॅनडाची मुलगी आहे आणि तिथे एक पंजाबी मुलगी आहे, असं तो म्हणाला. त्यावर गौरव मोरे म्हणाला की, असं काही नाही.
गौरव हा Most Eligible Bachelor आहे. तो लग्न नाही करणार तर त्याचे स्वयंवर असलायला हवं, असं समीर चौगुले म्हणाले.
पुढे ते असंही म्हणाले की, अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना मुलींनी सभागृहात त्याच्यासाठी शिट्या वाजवल्या आहेत.
उद्यापासून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' ही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.