ख्रिस्मसला संपूर्ण कपूर कुटुंब लंचसाठी एकत्र येत असतं. संपूर्ण कुटुंब यावेळी सेलिब्रेशन करतं.

पार्टीतील कपूर कुटुंबीयांना सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत.

आदर जैनने शेअर केलेल्या फोटोत त्याची गर्लफ्रेंड अलेखा आडवाणी, आलिया भट, जहान कपूर, करिश्मा कपूर, अरमान जैन, अनिसा जैन, नव्या नंदा, निखील नंदा, रणबीर दिसत आहेत.

पण या पार्टीत आलिया आणि रणबीरची मुलगी राहाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

पार्टीआधी रणबीर आणि आलियाने पहिल्यांदाच मुलीचा चेहरा जगासमोर आणत तिची पहिली झलक दाखवली.

दरम्यान या पार्टीत करीना आणि सैफ नव्हते. ते दोघेही कुटुंबासोबत लंडनमध्ये नववर्षं साजरं करत आहेत.

अमिताभ बच्चन यांची नात नव्यानेही सोशल मीडियावर पार्टीतील फोटो शेअर करत सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

नव्याने रणबीर कपूर आणि भाऊ अगस्त्यसोबतही फोटो शेअर केला आहे.

एका फोटोत ती आपले वडील निखील नंदा यांच्यासोबत दिसत आहे. निखील नंदा राजकपूर यांची बहीण ऋतु नंदा यांचे सुपूत्र आहेत.

VIEW ALL

Read Next Story