लक्झरी कार नव्हे प्रायव्हेट जेटनं फिरते 'ही' अभिनेत्री

ही अभिनेत्री आहे, भारतीय कलाजगतातील लेडी सुपरस्टार अशी ओळख असणारी नयनतारा.

नयनतारा

दाक्षिणात्य कलाजगतामध्ये नावारुपास आलेली नयनतारा येत्या काळात 'जवान' या चित्रपटातून शाहरुखसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

अभिनय क्षेत्रात काम

डायना मरियम कुरियन हे तिचं खरं नाव. पण, अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी मात्र तिनं नाव बदललं आणि नयनतारा अशी नवी ओळख तिनं जगासमोर आणली.

नात्याचा शेवट

जीवनातील अनेक आव्हानांचा सामना तिनं केला. दिग्दर्शक, अभिनेता आणि अष्टपैलू कलाकार अशी ओळख असणाऱ्या प्रभुदेवावर तिचा जीव जडला. पण, या प्रेमाच्या नात्याचा शेवट मात्र दुराव्यानं झाला.

जाणून आश्चर्य वाटेल

आतापर्यंतच्या चित्रपट कारकिर्दीमध्ये नयनतारानं अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण, ती एका चित्रपटासाठी 5 ते 10 कोटी रुपये इतकं मानधन घेते.

खासगी जेट

आलिशान जीवनशैली असणाऱ्या नयनताराकडे बऱ्याच महागड्या कार आणि स्वत:चं खासगी जेटही आहे.

उद्योजिका

विग्नेश शिवनशी विवाहबद्ध झालेली नयनतारा एक उद्योजिकाही आहे. 2021 मध्येच तिनं 'द लिप बाम' या ब्रँडची सुरुवात केली होती.

एकूण संपत्तीचा आकडा

नयनताराच्या एकूण संपत्तीचा आकडा मोजायचा झाल्यात सध्याच्या घडीला तो 25 मिलियन युएस डॉलर म्हणजेत भारतीय परिमाणानुसार 2,06,69,97,500 रुपये इतका असून त्यात दिवसागणिक भर पडत असल्याचं म्हटलं जातं.

VIEW ALL

Read Next Story