बाप्पाचे मखर, आसन अन् बरंच काही, इथे मिळेल स्वस्तात मस्त!

गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव आहे. मुंबईत तर महिनाभर आधीच गणेशोत्सवाची धूम सुरू होते. आत्ताही गणेशोत्सवाची तयारी करण्यासाठी मुंबईकरांची लगबग सुरू झाले असेल.

Mansi kshirsagar
Aug 31,2023


गणपतीची मखर असेल किंवा सजावटीचे साहित्य याने बाजारपेठ फुलल्या आहेत. पण मुंबईत असे काही मार्केट आहेत तिथे अगदी स्वस्तात मस्त दरात गणपतीच्या डेकोरेशनचे साहित्य मिळते.

किर्तीकर मार्केट

दादरमधील किर्तीकर मार्केट हा खरेदीसाठीचा सर्वोत्तम पर्याय आहे. आर्टिफिशिअल फुलांपासून ते बाप्पाच्या दागिन्यांपर्यंतचे सर्व पर्याय इथे उपलब्ध आहेत. फक्त सोमवारी ये मार्केट बंद असते. तर, सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंतच हे मार्केट खुले असते.

क्रॉफड मार्केट

सीएसएमटी परिसरात असलेले क्रॉफड मार्केट हे तर सर्वानाच ठाउक आहे. इथे डेकोरेशनपासून ते गिफ्ट देण्यापर्यंतच्या सर्व वस्तू कमी दरात मिळतील. इथे वर्षभर ग्राहकांची गर्दी असते त्यामुळं गर्दी टाळण्यासाठी शक्यतो सोमवार ते शुक्रवार या दिवसांत जा.

रानडे रोड

रानडे रोडवरही तुम्हाला स्वस्त व मस्त दरात बाप्पाचे मखर व त्याचबरोबर दागिने, फुले मिळतील. महाराष्ट्रीय पारंपारिक दागिनेही इथे मिळतील.

सांताक्रुझ

सांताक्रुझ पश्चिम येथेही मोठे मार्केट आहे. पारंपारिक पद्धतीची सजावटीचे साहित्य. लाइटच्या माळा हे तुम्हाला स्वस्त दरात मिळू शकणार आहे


यंदा बाजारात कृत्रिम फुलांची आरास, कापडाचे गणेश मंदिर, घडी करता येणारे बाप्पाचे आकर्षक आसन अशी वेगवेगळे साहित्य सध्या उपलब्ध आहेत

VIEW ALL

Read Next Story