गदर चित्रपट प्रदर्शित

अखेर चित्रपटगृहांमध्ये सनी देओल आणि अमिषा पटेलची मुख्य भूमिका असणारा 'गदर 2' चित्रपट रिलीज झाला आहे.

गदर चित्रपटाची रेकॉर्डब्रेक सुरुवात

गदर चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. नेटकऱ्यांनी चित्रपट अतिशय मनोरंजक असल्याचं सांगितलं आहे.

ईशा देओलची भावासाठी पोस्ट

यादरम्यान ईशा देओलने इन्स्टाग्रामवर भावाच्या चित्रपटाचा रिव्ह्यू केला आहे.

ईशाने केला 'गदर' चित्रपटाचा रिव्ह्यू

'आज सर्वजण बॉक्स ऑफिसवर सिंहाची गर्जना ऐकणार आहेत. चला तर मग गर्जना ऐकूयात. कारण हा वेगळी उंची गाठणार आहे,' असं ईशाने लिहिलं आहे.

पोस्टर केलं शेअर

आपल्या या पोस्टसह ईशाने 'गदर' चित्रपटाचं पोस्टरही शेअर केलं आहे. ज्यामध्ये सनी देओलने हातात बैलगाडीचं चाक उचललं आहे.

देओल कुटुंबीय चित्रपटासाठी उत्सुक

सनी देओल गदरच्या निमित्ताने पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर वादळ आणण्याच्या तयारीत आहे. करण देओलनेही वडिलांना चित्रपट यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

रिलीज होण्याआधीच 20 लाख तिकिटांची विक्री

अनिल शर्मा यांनी गदर चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून, रिलीज होण्याआधीच चित्रपटाची 20 लाख तिकिटं विकली गेल्याचा दावा आहे.

अनिल शर्मा यांचं दिग्दर्शन

अनिल शर्मा यांनीच आधीच्या गदर चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. 'गदर 2' हा या चित्रपटाचा सिक्वेल आहे.

VIEW ALL

Read Next Story