टीम इंडियाचा फलंदाज पृथ्वी शॉ सध्या इंग्लंडमध्ये आहे. काऊंटी क्रिकेटमध्ये तो नॉर्थम्पटनशायर संघाकडून खेळतोय.

काऊंटी क्रिकेटमध्ये सॉमरसेट संघाविरुद्ध त्याने 244 धावांची तुफानी खेळी केली. यात त्याने तब्बल 28 चौकार आणि 11 षटकार ठोकले

या कामगिरीने पृथ्वी शॉने भारतीय निवड समितीचं लक्ष वेधलं आहे. तसंच एकदिवसीय विश्व चषकसाठी टीम इंडियात आपली दावेदारी सांगितली आहे.

पृथ्वी शॉचं नाव निधी तपाडियाबरोबर जोडलं जात आहे. आयफा अॅवॉर्ड 2023 च्या कार्यक्रमात या दोघांचे एकत्रित फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

निधी तपाडिया प्रसिद्ध मॉडे आहे. टोनी कक्कर आणि नेह कक्कर यांच्या Kiss You या व्हिडिओत ती दिसली होती. या व्हिडिओला 8 कोटी व्ह्यूज मिळाले आहेत.

निधी तपाडिया सोशल मीडियावरी चांगलीच प्रसिद्ध आहे. इन्स्टाग्रामवर तिचे जवळपास 1 लाख 20 हजार फॉलोअर्स आहेत.

निधीचा नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात ती घोडेस्वारी करताना दिसली होती. पृथ्वी किंवा निधी दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल कोणताही खुलासा केलेला नाही.

निधीने पृथ्वीशॉच्या आयपीएलमधल्या फलंदाजीची इंस्टाग्रामवर एक स्टोरीही शेअर केली होती, जी स्वतः पृथ्वीनेही त्याच्या स्टोरीवर शेअर केली.

पृथ्वी शॉची गर्लफ्रेंड म्हटले जाणारी निधी तापडिया ही महाराष्ट्रातील नाशिकची रहिवासी आहे. निधीने कॉमर्समध्ये पदवीचे शिक्षण घेतले आहे.

निधीने छोट्या पडद्यावरील मालिकांमध्येही काम केलं आहे. निधी लोकप्रिय क्राईम शो सीआयडीचा भाग देखील होती

VIEW ALL

Read Next Story