अभिनेत्री राखी सावंत सध्या चांगलीच चर्चेत आहेत. पती आदिल खान दुर्रानी आणि राखी सावंत यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.

आदिल खान दुर्रानी तुरुंगात बाहेर आला आहे आणि त्यानंतर त्याने राखी सावंतवर आरोपांची मालिकाच सुरु केली आहे.

पण राखी सावतंही मागे नाही. आदिल दुर्रानीच्या प्रत्येक आरोपांवर ती पलटवरा करतेय. इतकंच नाही तीने आदिलवर गंभीर आरोपही केलेत.

राखीने आपला न्यूड व्हिडीओ बनवल्याचं आदिलने म्हटलं होतं. यावर आता राखीने नवा आरोप केला आहे आदिलने आपला न्यूड व्हिडीओ बनवून तो विकल्याचं तीचं म्हणणं आहे.

राखी सावंतने पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत हा आरोप केला आहे. मी बाथरुमध्ये आंघोळ करत होते, आणि त्यावेळी आदिलने मोबाईलने व्हिडीओ शूट केला असं राखीने सांगितलं आहे.

मी त्यावेळी त्याला काही बोलली नाही, कारण त्यावेळी तो माझा पती होता आणि माझ्या त्याच्यावर विश्वास होता. पण त्याने याचा त्याने गैरफायदा घेतला.

माझे अनेक न्यूड व्हिडीओ त्याने बनवले आहेत. यातला एक व्हिडीओ त्याने 47 लाख रुपयांना विकल्याचा दावा राखी सावंतने केला आहे.

हे व्हिडीओ व्हायरल झाले तर माझ्याकडे आत्महत्या करण्याशिवाय काही पर्याय उरणार नाही, संपूर्ण जग माझा न्यूड व्हिडीओ पाहिल अशी भीतीदेखील तीने व्यक्त केली आहे.

आपले न्यूड व्हिडीओ आदिलने दुबईत 47 लाख रुपयांना विकल्याचा आरोप राखीने केला आहे. मी भारताची एक सेलिब्रेटी आहे असं राखीने म्हटलंय.

राखीने ग्रर्भाशय काढल्याचा आरोप नुकताच आदिलने केला होता. यावर राखीने हे आरोप चुकीचे असल्याचं सांगत तिच्या डॉक्टरचा व्हिडीओ जारी केला होता.

VIEW ALL

Read Next Story