महाराष्ट्रीयन पदार्थांच्या यादीत अळूवडीचा समावेश असून यामुळे अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं.

अळूच्या पानांपासून आपण अळूचं फदफदं किंवा कुरकुरीत अळूवडी तयार करू शकतो. अळूवडी करण्याची प्रोसेस खूप मोठी आहे.

बेसनाचं मिश्रण तयार करण्यापासून ते वडी वाफवून - तळण्यापर्यंत खूप वेळ लागतो. पण तुम्ही अळूवडी न वाफवता देखील तयार करू शकतो. कसं चला पाहुयात

न वाफवता अळूवडी तयार करण्यासाठी हे साहित्य लागेल- अळूची पानं, गुळ, चिंच, बेसन, तांदुळाचं पीठ, आलं - लसूण - हिरव्या मिरचीची पेस्ट, लसणाची पेस्ट, दाण्याचं कूट, धणे पूड, हळद, लाल तिखट, गरम मसाला, बडीशेप, हिंग, बेकिंग सोडा, तेल

एका वाटीत कोमट पाणी घ्या, त्यात एक गुळाचा खडा आणि चिंच घालून ठेवा. 10 मिनिटानंतर गूळ आणि चिंच पाण्यात विरघळेल.

त्यानंतर एका बाऊलमध्ये एक कप बेसन, एक कप तांदुळाचं पीठ, २ टेबलस्पून आलं - लसूण - हिरव्या मिरचीची पेस्ट, एक टेबलस्पून लसणाची पेस्ट, एक टेबलस्पून ओवा, २ टेबलस्पून शेंगदाण्याचं कूट, एक चमचा धणे पूड, चिमुटभर हळद, दीड चमचा लाल तिखट, एक चमचा गरम मसाला, एक टेबलस्पून बडीशेप, चिमुटभर हिंग, व अर्धा चमचा बेकिंग सोडा घालून मिक्स करा.

यामध्ये तयार गुळ आणि चिंचेचं कोळ घालून मिक्स करा. फोडणीच्या पळीत २ टेबलस्पून तेल घालून गरम करा. व हे गरम तेल बॅटरमध्ये घालून मिक्स करा. बॅटर जास्त पातळ किंवा घट्ट नसून सरसरीत तयार करा. आपण त्यात गरजेनुसार पाणी देखील मिक्स करू शकता.

यानंतर अळूच्या उलट्या पानांवर हाताने बेसनाचे बॅटर एकसारखे लावा. त्यावर दोन ते तीन पानं ठेऊन त्यावरही बॅटर लावा. व पानांना वळवून रॉल करून पॅक करा.

रोल केल्यानंतर धारदार सुरीने वडी कापून घ्या. आता एका कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल कडकडीत गरम झाल्यानंतर, वडीला मधोमध दुमडून तेलात तळण्यासाठी सोडा. व दोन्ही बाजूने खरपूस तळून घ्या. तुमची कुरकुरीत अळूवडी झाली ना तयार.

VIEW ALL

Read Next Story