ती पत्रकारांसमोर आली तेव्हा पत्रकारही संभ्रमात पडल्याचं पहायला मिळालं. आता तिला या ड्रेसवरुन ट्रोल केलं जातयं. ही कोण आहे या ड्रेसवर चाहत्यांचं काय म्हणणंय पाहूयात...
तशी ती तिच्या वेगवेगळ्या कपड्यांमुळे सोशल मिडियावर चांगलीच चर्चेत असते. ती कधी शॉर्ट स्कर्ट आणि अगदीच वेगळ्या गोष्टींपासून साकारलेल्या भन्नाट टॉपमध्ये दिसते तर कधी फॉर्मल्समध्ये.
या आधीच्या एका वाक्यावरुनच तुम्ही ओळखलं असेल की आम्ही उर्फी जावेदबद्दल बोलत आहोत.
उर्फी जावेद ही तिच्या हटके आणि तितक्याच चर्चेत राहणाऱ्या कपड्यांमुळे अगदी सोशल मीडियापासून ते राजकीय वर्तुळापर्यंत अनेक ठिकाणी चर्चेचा विषय ठरल्याचं आपण सर्वांनीच पाहिलं असेल.
उर्फीने तिच्या या हटके ड्रेसिंग सेन्समध्ये अगदी स्वत:चेच फोटो लावूनही एकदा फोटोशूट केलं होतं. मात्र यंदा तीने एक फारच हटके ड्रेस परिधान केला.
उर्फीचा हा नवा लूक फारच वेगळा आहे. लाइट ब्लू कलरचा एक जोगा घालून उर्फी आज पापाराझींना भेटली.
या ड्रेसमध्ये उर्फीचा चेहरा, केसं, हातासहीत सर्व अंग झाकलेलं होतं. केवळ नाक आणि डोळ्यांजवळ हा ड्रेस ओपन होता.
उर्फीचा हा ड्रेस पूर्णपणे जिन्सच्या कापडापासून बनवण्याची शक्यता काहींनी व्यक्त केली. उर्फीने द मास्क अशी कॅफ्शन देत आपले या लूकमधील काही फोटो शेअर्स केलेत.
अनेकांनी या फोटोंवर कमेंट करुन उर्फीला ट्रोल केलं आहे. ही माझ्या घरचे पडदे घेऊन गेली असं एकाने म्हटलं आहे तर अन्य एकाने तिला निळं वटवाघूळ म्हटलं आहे.
एकाने हा ड्रेस फारच उत्तम आहे तुझ्यासाठी. या ड्रेसवरुनच तू या जगातील नाही असं दिसून येत आहे, असा खोचक टोला उर्फीला लगावला आहे.
उर्फीला यावरुन ट्रोल केलं जात असलं तरी तिच्या या फोटोंना 11 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. तर एकूण 600 हून अधिक जणांनी कमेंट यावर केल्यात.