प्रसिद्ध कृष्णा विवाहबंधनात

भारतीय क्रिकेट संघाकडून खेळणारा प्रसिद्ध कृष्णा विवाहबंधनात अडकला आहे.

राजस्थान रॉयल्सने शेअर केला फोटो

रचना कृष्णा असं प्रसिद्धच्या बायकोचं नाव आहे. राजस्थान रॉयल्सने ट्विटरला लग्नातील फोटो शेअर केला आहे.

कृष्णाच्या हळदीतील फोटो, व्हिडीओ व्हायरल

यादरम्यान प्रसिद्ध कृष्णाच्या हळदीतील अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

प्रसिद्ध कृष्णाची बायको कोण?

रचना कृष्णाने इंस्टाग्रामला अकाऊंट प्रायव्हेट केलं असल्याने तिची जास्त माहिती उपलब्ध नाही.

दुखपातीमुळे IPL पासून दूर

प्रसिद्ध कृष्णा गेल्या काही काळापासून स्ट्रेस फॅक्चरच्या दुखापतीचा सामना करत आहे. यामुळेच सध्याच्या हंगामात तो खेळू शकला नाही.

किती सामने खेळलाय?

कृष्णाने भारतीय संघाकडून 14 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 25 विकेट्स घेतले. आयपीएलमध्ये त्याने 51 सामने खेळले असून 49 विकेट्स घेतल्या आहेत.

ऋतुराज गायकवाडही विवाहबंधनात

याआधी भारतीय क्रिकेटर ऋतुराज गायकवाड उत्कर्षा पवारसह विवाहबंधनात अडकला होता.

VIEW ALL

Read Next Story