कौन बनेगा करोडपतीचा 15वा सीझन सुरू झाला आहे, जो अमिताभ बच्चन होस्ट करत आहेत. वृत्तानुसार, अमिताभ या शोच्या एका एपिसोडसाठी सुमारे 7.5 कोटी रुपये घेतात.
'टेलिचक्कर' मधील वृत्तानुसार सलमान खानने 'बिग बॉस ओटीटी 2' होस्ट करण्यासाठी दर आठवड्याला 25 कोटी रुपये आकारले आहेत.
रोहित शेट्टी 'खतरों के खिलाडी' हा रिअॅलिटी शो होस्ट करतो. या शोचा 13वा सीझन सुरू आहे. रोहित एका एपिसोडसाठी 50,000 रुपये घेत असल्याचा दावा केला जात आहे.
भारती सिंगने अनेक रिअॅलिटी शो होस्ट केले आहेत. एका एपिसोडच्या होस्टिंगसाठी भारती 5 ते 6 लाख रुपये घेते असा दावा केला जात आहे.
करण जोहर अनेक वर्षांपासून 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये हजेरी लावत आहे. करण कॉफी विथ करणसाठी तो 1 ते 2 कोटी रुपये घेतो.
राघव जुयाल 'डान्स प्लस' शो होस्ट करतो. या शोसाठी तो प्रति एपिसोड 2 ते 3 लाख रुपये घेतो.
टीव्ही अभिनेता जय भानुशालीने अनेक डान्स आणि सिंगिंग रिअॅलिटी शो देखील होस्ट केले आहेत. जय प्रत्येक एपिसोडसाठी 4 ते 5 लाख रुपये घेतो.
एकता कपूरचा रिअॅलिटी शो 'लॉक अप' कंगना राणौतने होस्ट केला होता. या शोच्या एका एपिसोडसाठी कंगनाने एक कोटी रुपये आकारल्याचा दावा केला जात आहे.