चहा हा अमृतासमान आहे. अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहापासून होते. चहा छान झाला असेल तर दिवसांची सुरुवात मस्त होते. अनेकजण मसाला चहा बनवताना दुकानातील विकतच मसाला आणतात.
चहाचा मसाला घरच्या घरीदेखील बनवता येऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला मसाला चहाची सिक्रेट रेसिपी सांगणार आहोत.
10-12 लवंग, 12-14 वेलची, 7-9 काळी मिरी, 2 मोठे चमचे बडिशोप, 1 इंच दालचीनी, 1 इंच सुकलेले आले, 3-4 जायफळ, ५-8 तुळशीची पाने
चहाचा मसाला तयार करण्यासाठी सर्वप्रथम सर्व साहित्य गरम तव्यावर भाजून घ्या.
व्यवस्थित सर्व मसाले भाजून घेतल्यानंतर ते काही काळ थंड होण्यासाठी ठेवून द्या. थंड झाल्यानंतर मिस्करमध्ये टाकून त्यांची छान पावडर तयार करुन घ्या
मग तुमचा चहाचा मसाला तयार आहे. मिक्सरमधून मसाला काढून एका एअरटाइट कंटेनरमध्ये ठेवून द्या
सर्व मसाल्यांची पूड एकदम बारीक वाटली नाही तरी चालेल. चहा करताना ती सहज गाळता येते शिवाय अर्कही चहात चांगला उतरतो