अनेकदा त्या मैदानात दिसून येतात आणि कॅमेरा त्यांची झलक टिपतो. पण त्या आहेत तरी कोण पाहूयात...
इंडियन प्रमिअर लिगचं 16 वं पर्व म्हणजेच IPL 2023 नुकतच संपुष्टात आलं. हे पर्व चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने जिंकलं.
धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेने तब्बल पाचव्यांदा आयपीएलचा चषक उंचावला.
या स्पर्धेमध्ये महिला मालक असलेले चार संघ खेळले. मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी असून प्रीति झिंटा पंजाब किंग्सची मालकीण आहे.
त्याचप्रमाणे जुही चावला ही कोलकाता नाईट रायडर्सची सहमालकीण आहे. तर काव्या मारन या सनरायझर्स हैदराबादच्या मालकीण आहेत.
सनरायझर्स हैदराबादच्या मालकीण काव्या मारन या सन टीव्ही नेटवर्कचे मालक कलानिधी मारन यांच्या कन्या आहेत.
न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमधील लियोनार्ड एन स्टर्न स्कूलमधून काव्या यांनी एमबीएची पदवी घेतली आहे.
काव्या या स्वत: क्रिकेटच्या मोठ्या चाहत्या आहेत. त्या सनरायझर्स हैदराबादच्या संघाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदाच्या पर्वामध्येही काव्या या मैदानामध्ये आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी मैदानात उपस्थित असल्याचं दिसून आलं होतं. यावरुनच त्यांचं क्रिकेटवरील प्रेमही पुन्हा एकदा अधोरेखित झालं.
काव्या मारन सध्या सन टीव्ही नेटवर्कच्या मालकीच्या ओव्हर-द-टॉप म्हणजेच ओटीटी प्लॅटफॉर्म 'सन नेक्स्ट'च्या प्रमुख आहेत.
काव्या या माजी केंद्रीय मंत्री मुरासोली मारन यांची नात, एम. करुणानिधी मुरासोली मारन यांची पुतणी आणि माजी केंद्रीय मंत्री दयानिधी मारन यांची भाची आहे.
कालानिधि मारन यांच्या सन टीव्ही नेटवर्कमध्येही काव्या यांच्याकडे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. त्यांची एकूण संपत्ती 409 कोटी रुपये इतकी आहे.
31 वर्षीय काव्या यांचं आयपीएल कनेक्शन आणि व्यवसायिक क्षेत्रातील यशाबरोबरच त्यांचा लूकही अनेकदा चर्चेत असतो.