लग्नानंतर सोनाक्षी सिन्हा आणि पती झहीर इक्बाल सतत सुट्टीवर जाताना दिसत आहेत.
अशातच पुन्हा एकदा दोघे समुद्रकिनारी मज्जा मस्ती करताना दिसले.
नुकताच सोनाक्षी सिन्हाने तिचा एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे.
व्हिडीओमध्ये सोनाक्षी सिन्हा समुद्रकिनारी उभी असताना पतीने तिला धक्का दिला आणि ती पडली.
सोनाक्षीने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटले की, हा मुलगा मला शांतपणे एकही व्हिडीओ काढू देत नाही.
सध्या दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.