(सर्व छायाचित्र- परिणीती चोप्रा/ इन्स्टाग्राम)

गोष्ट एका सुरेख नात्याची

परिणीतीची अनेक रुपं

कुठे कुटुंबीयांसोबत कल्ला करणारी परिणीती आणि कुठे राघव चड्ढा यांच्या खांद्यावर विसावा घेऊन भावनिक झालेली परिणीती अशी तिची रुपं इथे पाहायला मिळाली.

नात्याची सुरुवात होण्याचा क्षण

आपल्या नात्याची सुरुवात होण्याचा क्षण, राघव यांचं व्यक्तीमत्त्वं आणि त्यांनी एक व्यक्ती म्हणून केलेला आपला स्वीकार पाहता सर्वांनाच तिचे हे फोटो भावले.

या दोघांनी हे खास क्षण अनुभवले

जी माणसं आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत त्यांच्या उपस्थितीत परिणीती आणि राघव या दोघांनी हे खास क्षण अनुभवले.

राघव चड्ढा आणि परिणीतीचा साखरपुडा

सतत हसरी, बडबडी परिणीती भावूक झाल्याचं पाहत राघव चड्ढा यांनीही तिला सावरण्याचा प्रयत्न केला.

परिणीती भावूक

आपण जी परिकथा स्वप्नात पाहिली होती, ती इतक्या सुंदर पद्धतीनं सत्यात उतरताना पाहून परिणीतीही या सोहळ्यादरम्यान भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

खास क्षण

या खास सोहळ्यातील काही खास क्षण परिणीतीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला आणले.

कुटुंब आणि मित्रपरिवाराची उपस्थिती

कुटुंब आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीमध्ये या जोडीनं त्यांच्या प्रेमकहाणीला एका नव्या वळणावर नेण्याचा निर्णय घेतला आणि या प्रवासाला सुरुवातही केली.

साखरपुडा

नुकतीच एका सुरेख अशा सोहळ्यात राघव आणि परिणीती यांचा रोका, साखरपुडा पार पडला.

parineeti chopra raghav chaddha

परिकथेजोगी प्रेमकहाणी सत्यात उतरताना पाहून परिणीतीला अश्रू अनावर

VIEW ALL

Read Next Story