घटस्फोट दिला त्याच पत्नीच्या पुन्हा प्रेमात पडला अभिनेता; पुन्हा करणार लग्न?
प्रेमाची नाती आणि खासगी आयुष्यामुळं चर्चेत असणारा 'गोलियों की रासलीला- रामलीला' फेम अभिनेता गुलशन देवैया आता म्हणे पुन्हा प्रेमात पडला आहे.
पहिल्या पत्नीसोबतच्या घटस्फोटानंतर गुलशन आता जिच्या प्रेमात पडला आहे ती दुसरीतिसरी कोणी नसून, त्याचीच पहिली पत्नी (Ex Wife) Kallirroi Tzaifeta आहे.
2012 मध्ये गुलनश आणि कॅल्लिरोईचं लग्न झालं होतं, 2020 मध्ये त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर मात्र या दोघांचं नातं नव्यानं बहरलं आणि ते पुन्हा एकमेकांच्या जवळ आले.
सध्या सुरु असणाऱ्या चर्चांनुसार गुलनशन त्याच्याच एक्स वाईफला डेट करत असून, आता या नात्याकडे पाहण्याचा त्याचा वेगळाच दृष्टीकोन आहे. येत्या काळात या नात्यावर ते आणखी सकारात्मकपणे काम करू इच्छितात.
एका मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार गुलशनच्या मते आता ते दोघंही या नात्याकडे प्रगल्भतेनं, साचेबद्धपणानं पाहत आहेत. एक्स वाईफसोबतची मैत्री आणि नात्यातील बंधांवर गुलशनला विश्वास आहे.
दरम्यान लग्नाच्या जरी चर्चा असल्या तरीही गुलशन आणि कॅलिरोईनं मात्र अद्याप या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. त्यामुळं या नात्याचं भविष्य काय याचीच उत्सुकता चाहत्यांनाही लागून राहिली आहे.