आकर्षक बाब म्हणजे या कार्यक्रमाला शिल्पा शेट्टीचीही हजेरी होती. त्यामुळं 90 च्या दशकातील गाजलेलं प्रेमाचं त्रिकूटच इथं पाहायला मिळालं अशी अनेकांची प्रतिक्रिया होती.
सोशल मीडियावर ज्यावेळी अक्षय आणि रवीनाचे हे फोटो चाहत्यांनी पाहिले तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
या कार्यक्रमादरम्यान, रवीवानं अक्षयला पुरस्कार दिला त्यावेळी त्या दोघांनीही एकमेकांना मैत्रीपूर्ण मिठीही मारली. हे फोटो प्रचंड व्हायरल झाले.
20 वर्षांनंतर जेव्हा एकाच ठिकाणी या दोघांना पाहिलं गेलं तेव्हा त्यांची मैत्री, नात्यातील सहजपणा आणि चेहऱ्यावरचा आनंद पाहण्याजोगा होता.
कधीएकेकाळी प्रेमी युगूल म्हणून ओळखली जाणाऱ्या या जोडीचं नातं अर्ध्यावरच तुटलं. पण, नात्यातली आपुलकी आजही टिकून आहे.
90 चं दशक गाजवणारी अक्षय कुमार आणि रवीना टंडन ही जोडी पुन्हा एकदा चाहत्यांनी एकत्र पाहिली. निमित्त होतं एका कार्यक्रमाचं.
अक्षय- रवीना...;एकेकाळचं Couple अनेक वर्षांनंतर आमनेसामने, पुढे काय घडलं?