फिल्म मेकर कृष्णा वाप्सीसोबत लग्न केलं

यानंतर रम्याने 2003 मध्ये फिल्म मेकर कृष्णा वाप्सीसोबत लग्न केलं. दोघांना ऋत्विक नावाचा मुलगा आहे.

Mar 06,2023

गर्भपाताची बातमी

या बातम्यांमुळे रविकुमार आणि त्यांच्या पत्नीच्या नात्यात दुरावा येऊ लागला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांपैकी कोणालाही मूल नको होतं. अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, अभिनेत्रीने गर्भपातासाठी जवळपास 75 लाख रुपये मागितले होते. मात्र, जेव्हा दोघांना या संबंधीत आणि गर्भपात प्रकरणी चौकशी करण्यात आली तेव्हा त्यांनी ही बातमी चुकीची आहे असं सांगितलं.

दिग्दर्शक विवाहित होता

अनेक रिपोर्ट्समध्ये असंही म्हटलं गेलं आहे की विवाहित दिग्दर्शकावर तिचं इतकं प्रेम होतं की ती लग्न करण्याआधीच गरोदर होती.

रविकुमारला डेट करायला सुरुवात केली

राम्याने चित्रपट दिग्दर्शक केएस रविकुमार यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटांमध्ये रविकुमारसोबत काम करताना दोघंही एकमेकांच्या जवळ आले. अगदी एकमेकांना डेट करायला त्यांनी सुरुवात केली. विशेष म्हणजे रविकुमार यांचं आधीच लग्न झालं होतं.

तीन दशकांपासून इंडस्ट्रीवर राज्य केलं

'बाहुबली'ची आई रम्या कृष्णन जवळपास 3 दशकांपासून सिनेमात काम करत आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण अनेक दाक्षिणात्य चित्रपटांशिवाय ती 'बाहुबली' चित्रपटासाठीही ओळखली जाते. या चित्रपटापूर्वीही राम्याचं नातं अनेक वादांशी जोडलं गेलं आहे.

VIEW ALL

Read Next Story